जुन्नर तालुक्यातल्या पिंपळवडी येथील भटकळवाडी शिवारात आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास जालिंदर बबन लेंडे या शेतकऱ्याच्या विहिरीत दोन बिबटे पडल्याचे आढळून आले. ग्रामस्थ नितीन लेंडे यांनी ही माहिती वनखात्याला कळवली. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीत दोन पिंजरे सोडून या बिबट्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या दोन्ही बिबट्यांना माणिकडोल येथील बिबट्या निवारण केंद्रात दाखल करण्यात आलं आहे. पाण्याचा शोध घेण्यासाठी हे बिबटे आले असावेत आणि मग विहिरीत पडले असावेत असा अंदाज व्यक्त होतो आहे. उन्हाळा जवळ आला की पाण्याच्या शोधार्थ प्राणी बाहेर पडतात. त्यावेळी अशा घटना घडत असतात. ही घटनाही अशीच घडली असावी असा अंदाज व्यक्त होतो आहे. या दोन्ही बिबट्यांचा आवाज ऐकून ग्रामस्थांनी वनविभागाला यासंदर्भातली माहिती दिली. वन विभागाने या दोन्ही बिबट्यांची सुखरूप सुटका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा