विद्यापीठ रखवालदाराच्या खुनातील आरोपी मनीष नागोरी याने दिलेल्या माहितीवरून पुणे पोलिसांनी सुपारी घेऊन खून करणाऱ्या दोघांना गोव्यातून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाबाबत चौकशी करण्यात येत आहे.
पुणे विद्यापीठातील सुरक्षारक्षक प्रल्हाद जोगदंडकर आणि डॉ. दाभोलकर यांच्या खुनामध्ये मारेकऱ्यांनी एकाच प्रकारचे पिस्तूल वापरले आहे. विद्यापीठ खून प्रकरणी पोलिसांनी नागोरीसह चौघांना अटक केली आहे. ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. नागोरीने ४७ जणांस शस्त्रास्त्र पुरविल्याचे समोर आले आहे. त्यानेच डॉ. दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना शस्त्र पुरविल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गोव्यातून दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे डॉ. दाभोलकर खून प्रकरणी कसून चौकशी सुरु आहे. त्याच बरोबर सातारा येथील एका युवकाकडे ही तपास सुरू आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.
डॉ. दाभोलकर हत्याकांड: गोव्यातून दोनजण चौकशीसाठी ताब्यात
विद्यापीठ रखवालदाराच्या खुनातील आरोपी मनीष नागोरी याने दिलेल्या माहितीवरून पुणे पोलिसांनी सुपारी घेऊन खून करणाऱ्या दोघांना गोव्यातून ताब्यात घेतले आहे.
First published on: 07-12-2013 at 12:07 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two men arrested by goa police in narendra dabholkar murder case