लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: येरवडा मध्यवर्ती कारागृहात बुधवारी सायंकाळी पुन्हा एकदा कैद्यांकडे दोन मोबाइल, दोन बॅटऱ्या, चार्जर आणि एक सिमकार्ड सापडून आले. मागील काही महिन्यांपासून सातत्याने कारागृहात मोबाइल सापडत असल्याच्या घटना सुरू आहे.
या घटना रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना आणि सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. पण, तरीही मोबाइल या घटना थांबलेल्या नाहीत. प्रत्येक तुरुंग अधिकारी, कर्मचारी आणि कैद्यांची कसून झडती घेऊनही कारागृहात वारंवार मोबाइल सापडत असल्याने पोलिसांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महेश तुकाराम माने, अजय महादेव कांबळे, अनिकेत अर्जुन चौधरी आणि नरेश गणेश दळवी या न्यायाधीन (कच्चे) कैद्यांवर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुरुंग अधिकारी शेरखान पठाण यांनी तक्रार दिली आहे.
आणखी वाचा-अजित पवारांसोबत काम करताना अडचण येईल अस वाटत नाही- भाजप आमदार महेश लांडगे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा कारागृहात सर्कल एकमधील बराक चारमध्ये काही कैदी मोबाइल वापरत असल्याची कुणकुण प्रशासनाला लागली होती. बुधवारी सायंकाळी बराकीत जाऊन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कैद्यांची झडती सुरू केली. माने आणि कांबळे यांच्याकडे कसून चौकशी आणि खाक्या दाखविल्यावर दोघांनी आपल्याकडचे मोबाईल काढून दिले.
मोबाइल जप्त केल्यावर चार्जर आणि सिमकार्ड मिळून आले नाही. त्यामुळे आणखीन सखोल चौकशी केल्यावर बराकीतील कैदी चौधरी यांच्याकडे मोबाइलचा चार्जर आणि दळवी याच्याकडे सिमकार्ड सापडून आले. बराकीतील चार कैद्यांकडे दोन मोबाइल, दोन बॅटऱ्या,चार्जर आणि सिमकार्ड सापडले.
…तरीही मोबाइल सापडण्याच्या घटना थांबेना
कैद्यांनी चोरून मोबाइल वापरू नयेत, यासाठी येरवडा कारागृहात स्मार्ट कार्ड टेलिफोन बूथ सुविधा सुरू करण्यात आली आहे. याशिवाय कैद्यांना मोबाइल पुरविण्याचा संशय असणाऱ्या चौदा कर्मचाऱ्यांची राज्याच्या इतर कारागृहात बदली करण्यात आली. कैद्यांची आणि कर्मचाऱ्यांची झडती वाढविण्यात आली. तरीही कारागृहात मोबाइल सापडतच आहेत. मोक्का, अंडा सेलमधील कैदी, दहशतवादी, नक्षलवादी आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल कैद्यांना फोनची सुविधा दिली जात नाही. या प्रकारातील कैद्यांकडून कारागृहात लपून मोबाइल बाळगला जातो, असा दावा प्रशासनाने केला आहे.