डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला आज दोन महिने पूर्ण झाले आहेत. दोन महिन्यानंतरही मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिसांना यश प्राप्त झालेले नाही.
पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर २० ऑगस्ट रोजी नरेंद्र दाभोलकरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी दोन संशयितांची रेखाचित्र जारी केलं. मात्र तब्बल दोन महिने उलटूनही मारेकरी मोकाट असल्याने जनतेमध्ये संतापाची भावना आहे.
पोलिसांची १९ पथके मारेकऱ्यांना पकडण्यासाठी कार्यरत आहेत. पण, त्यांचे हाती अद्याप काही लागलेले नाही. विशेष म्हणजे दाभोळकरांच्या हत्येचा तपास करत असताना इतर काही गुन्ह्यांतील आरोपींचा शोध पोलिसांना लागला. मात्र, दाभोळकरांचे मारेकरी अजूनही हाती लागले नाहीत.

Story img Loader