पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी राज्य शासनाने एक अतिरिक्त आयुक्त आणि दोन उपायुक्त या पदांना मंजुरी दिली होती. त्यानुसार दोन पोलीस उपायुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस उपायुक्तांची संख्या आता पाचवर पोहोचली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> हिंगण्यातील नाला चोरीला; महापालिकेकडे तक्रार!

मुंबईतील यूसीटीसी फोर्स वन येथील पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे आणि नाशिकमधील महाराष्ट्र पोलीस अकादमी येथील अपर पोलीस अधीक्षक शिवाजी पवार यांची पिंपरी – चिंचवड शहरात पोलीस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश राज्याच्या गृह विभागाचे अवर सचिव स्वप्नील बोरसे यांनी काढले आहेत. सध्या पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयात स्वप्ना गोरे (मुख्यालय, गुन्हे), विवेक पाटील (परिमंडळ – १) आणि काकासाहेब डोळे (परिमंडळ – २) हे तीन पोलीस उपायुक्त कार्यरत आहेत. पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी आणखी दोन उपायुक्त पदांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी त्यासाठी पाठपुरावा केला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two more deputy commissioner of police for pimpri chinchwad city pune print news ggy 03 zws