पिंपरी चिंचवड: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला म्हणून पिंपरी- चिंचवड शहराची ओळख आहे. त्याच पिंपरी- चिंचवड शहरात आता राष्ट्रवादीची दोन कार्यालये होण्याची शक्यता आहे. तसेच सूचक वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकारणी सदस्य सुनील गव्हाणे यांनी केलं आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते स्टॅम्प पेपरवर आम्ही अजित पवार यांच्या पाठीशी असल्याचं लिहून देत आहेत. हाच संघर्ष राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यात बघायला मिळतो आहे. शरद पवार गटाचे सुनील गव्हाणे यांनी शरद पवार यांच्या पुरोगामी विचारांच्या लोकांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. भविष्यात न्यायालयीन लढाई होऊ शकते या दृष्टीने आम्ही देखील कार्यकर्त्यांकडून शरद पवार यांच्या पाठीशी असल्याचं स्टॅम्प पेपरवर लिहून घेणार असल्याचं देखील त्यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुनील गव्हाणे म्हणाले, पिंपरी- चिंचवड शहरात शरद पवार गट आणि अजित पवार गट अशी राष्ट्रवादीचे दोन कार्यालये दिसले तर आश्चर्य वाटू देऊ नका. शरद पवारांच्या विचारावर निष्ठा ठेवून राजकारण करणाऱ्या लोकांना एकत्र आणणार असून त्यांची मोट बांधून संघटन करणार आहोत असे देखील गव्हाणे म्हणाले आहेत. पुरोगामी विचार टिकवण्यासाठी ही लढाई सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आम्ही शहरातील अजित पवार गटाला शुभेच्छा देत आहोत. आमची लढाई ही भाजपच्या विचारधारेच्या विरोधात आहे आणि त्याच लोकांना आम्ही सोबत घेणार आहोत. लवकरच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांना शहराध्यक्ष पदावरून कार्यमुक्त करण्यात येणार आहे. त्यांच्या जागी शरद पवार गटाचा नवीन शहराध्यक्ष नेमला जाईल असे सूतोवाच गव्हाणे यांनी केले आहेत. एकाच कार्यालयातून दोन गटाचे कामकाज होऊ शकत नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे दोन कार्यालये होतील याचे आश्चर्य वाटायला नको. असं स्पष्ट मत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकारणी सदस्य सुनील गव्हाणे यांनी व्यक्त केलं आहे.

आणखी वाचा-बंडखोर राहुल कलाटे शिवसेना शिंदे गटात गेले तर ठाकरे गटाला काडीचाही फरक पडणार नाही – शहराध्यक्ष सचिन भोसले

“कार्यकर्त्यांमध्ये समभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. अजित पवार यांनी १९९१ पासून शहराच नेतृत्व केलं आहे. आम्ही राष्ट्रवादी चे कार्यकर्ते अजित पवार यांच्या पाठीशी आहोत. म्हणून अफीड्युट करून घेत आहोत. राष्ट्रवादी पक्ष विभागला जाऊ नये म्हणून अजित पवार हे शरद पवारांची भेट घेत आहेत. आपण एकत्र येऊन राज्याला पुढे नेऊ अशी विनंती करत आहेत. आम्हाला आशा आहे की याचा सकारात्मक विचार होईल”. -फझल शेख- राष्ट्रवादी अजित पवार गट कार्याध्यक्ष

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two party offices sharad pawar and ajit pawar in pimpri chinchwad kjp 91 mrj
Show comments