पिंपरी: महाप्रसादाचे जेवणाचे टेबल रस्त्यावर लावल्याने शेजाऱ्यांनी दोघांवर कोयत्याने वार केले. तसेच एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना रविवारी सायंकाळी काळेवाडी येथे घडली. याप्रकरणी ३८ वर्षीय व्यक्तीने काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व्यक्तीने रविवारी सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन केले होते. जेवणाचे टेबल त्यांनी रस्त्यावर लावले होते. त्या कारणावरून आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी व्यक्तीला शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर कोयत्याने फिर्यादी यांच्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. फिर्यादीच्या बहिणीचा विनयभंग केला. काळेवाडी पोलीस तपास करीत आहेत.

कोयता बाळगणारा अटकेत

कोयता बाळगल्या प्रकरणी वाकड पोलिसांनी रोहित सिद्राम नामकर (वय २१, रा. थेरगाव) याला अटक केली आहे. त्याच्याकडून ५०० रुपये किमतीचा कोयता जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी लक्ष्मीबाई बारणे उद्यानाच्या बाजूला थेरगाव येथे करण्यात आली. याप्रकरणी पोलीस अंमलदार ज्ञानदेव झेंडे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.