शिरुर : शिरुर तालुक्यात दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जण मृत्युमुखी पडले. अपघात ३५ ते ४० वर्षाच्या पुरुष व सौ. सुवर्णा रंगनाथ बारगळ, वय ४१ वर्षे, रा. पळवे खुर्द, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर हे मृत्युमुखी पडले .

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मलठण शिंदेवाडी येथे झालेल्या अपघात प्रकरणी रंगनाथ रावसाहेब बारगळ, वय ४२ वर्षे, व्यवसाय शेती, रा. पळवे खुर्द, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर यांनी फिर्याद दिली आहे . १६ फेबृवारी २०२५ रोजी सकाळी मलठण, शिंदेवाडी येथे रांजणगांव ओझर अष्टविनायक हायवे रोडवरील हॉटेल जयमल्हारचे जवळ रंगनाथ बारगळ व त्यांची पत्नी सुवर्णा बारगळ हे मोटार सायकल नं. एम .एच- १६ सी बी/९२७६ वरून मंचर बाजूकडे जात असताना समोरुन येणारे लाल रंगाचे ट्रॅक्टर नंबर माहीत नाही या वरील अनोळखी चालकाने ट्रॅक्टर भरधाव वेगात चालवून मोटार सायकलला धडक दिली . या अपघातात सुवर्णा रंगनाथ बारगळ,( वय -४१ ) वर्षे, रा. पळवे खुर्द, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर या मरण पावल्या .

दुसरा अपघात पुणे अहिल्यानगर महामार्गावर झाला याप्रकरणी रमेश पांडुरंग चौधरी रा. सतराकमान पुलाजवळ शिरुर ता शिरुर यांनी अज्ञात वाहनावरील अज्ञात चालक विरोधात फिर्याद दिली आहे . पुणे अहिल्यानगर हायवे रोडवर पुणे ते नगर जाणारे लेन वर आर. के -हॉटेल समोर एक ३५ ते ४० वर्षे वयोगटातील अनोळखी पुरुषास अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हयगयीने अविचाराने भरधाव वेगात चालववून धडक दिली त्यात ते मृत्युमुखी पडले .

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two people died in two separate accidents pune print news mrj