पवना धरणात बुडून मुंबईतील तेरा वर्षीय शाळकरी मुलीसह दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पाण्यात उतरलेल्या सात जण पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने सात जण बुडाले. त्या पैकी पाच जणांना वाचविण्यात यश आले.

हेही वाचा >>> गणेश भक्तांसाठी मध्य मुंबईत वाहनतळाची व्यवस्था

आर्या दीपक जैन (वय १३), समीर कुलदीप सक्सेना (वय ४३) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. पाण्यात बुडालेले पायल समीर सक्सेना (वय ४२), लक्ष्य सक्सेना (वय १४), यश सक्सेना (वय ८), आदी चुगानी (वय १४), अंश सुरी (वय १४) यांना वाचविण्यात यश आले आहे. सक्सेना कुटुंबीय मुंबईतील प्रभादेवी भागातील रहिवासी आहेत. सक्सेना कुटुंबीय आणि त्यांचे मुलांचे मित्र पवना धरण परिसरात पर्यटनासाठी आले होते. फांगणे गावाजवळ पवना धरणातील पाण्यात आर्या, समीर, पायल, लक्ष्य, यश, आदी, अंश पाण्यात उतरले. त्या वेळी पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने सर्व जण बुडाले. सात जण पाण्यात बुडाल्याची माहिती पवनानगर चौकीतील पोलीस हवालदार रफीक शेख आणि विजय गाले यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. पाण्यात बुडालेल्या सात जणांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले. उपचारांपूर्वीच आर्या जैन, समीर सक्सेमा यांचा मृत्यू झाला, अशी माहिती लाोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिली. ऐन गणेशोत्सवात शाळकरी मुलीसह दोघांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्यानंतर नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.

Story img Loader