पुणे : जादा कमाईचे आमिष आणि अर्धवेळ नोकरीच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून हडपसर परिसरातील दोघांची २८ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. जादा कमाईचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एकाला तब्बल १५ लाख १५ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला. ही घटना १० सप्टेंबर ते ११ नोव्हेंबर २०२३ कालावधीत हडपसरमध्ये घडली आहे. याप्रकरणी दर्शन धार्मिक (वय ४३) यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार हडपसर पोलिसांनी मोबाइलधारक चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शन हे हडपसरमध्ये राहायला असून, सायबर चोरट्यांनी १० सप्टेंबर २०२३ मध्ये त्यांना दूरध्वनी केला. त्यांचा विश्वास संपादित करून वेळोवेळी प्रीपेड टास्क देऊन पूर्ण करण्यास सांगितले. त्याबदल्यात किरकोळ स्वरूपात परतावा दिला. त्यामुळे दर्शन यांनी गुंतवणूक करण्यास सुरूवात केली. सायबर चोरट्यांनी त्यांना जादा कमाईचे आमिष दाखविल्यांनतर दर्शनने वेळोवेळी गुंतवणूक केली. तब्बल १५ लाखांहून अधिक रकमेची गुंतवणूक केल्यानंतरही त्यांना परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यांनतर त्यांनी तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक अमर काळंगे पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा…पिंपरी: पाच एकर जमीन विकून जुगारात हारला; ऑनलाइन जुगार खेळण्यासाठी बहिणीच्या घरी चोरी

दुसऱ्या घटनेमध्ये अर्धवेळ नोकरीच्या आमिषाने तरुणाला १३ लाख ४८ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला. ही घटना २४ मे ते २६ सप्टेंबर २०२४ कालावधीत हडपसर परिसरात घडली आहे. याप्रकरणी सतीश रासकर (वय ४९, रा. हडपसर)  यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार रासकर हे हडपसरमध्ये राहायला असून आरोपीसोबत त्यांची ओळख झाली होती. २४ मे २०२४ रोजी आरोपींनी त्यांना अर्धवेळ नोकरीचे आमिष दाखविले. त्यासाठी काही रक्कम द्यावी लागेल, तरच नोकरी मिळेल असे सांगितले. नोकरीसाठी रासरकर यांनी रक्कम आरोपीच्या बँक खात्यात वर्ग केली. वेळोवेळी रक्कम जमा करीत तब्बल १३ लाखांहून अधिक रक्कम जमा केल्यांनतरही त्यांना नोकरी मिळाली नाही. फसवणूक झाल्याप्रकरणी रासकर यांनी तक्रार नोंदविली असून  वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील पुढील तपास करीत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two people from hadapsar area have cheated of 28 lakhs by cyber thieves with lure of extra income and part time job pune print news vvk 10 sud 02