लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वारासह महिलेचा मृत्यू झाल्याची घटना लोहगाव परिसरातील संजय पार्क रस्त्यावर घडली. याप्रकरणी मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Image of the stampede incident
“आईच्या मृत्यूबाबत मुलीला माहित नाही”, ‘पुष्पा २’ च्या प्रीमियर वेळी झालेल्या चेंगराचेंगरीतील पीडितेच्या पतीची हृदयद्रावक गोष्ट
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
pune incident of speeding car hitting couple on two wheeler on flyover in Gultekdi
मोटारचालकाची मुजोरी; उड्डाणपुलावर दुचाकीस्वार दाम्पत्याला धडक, दाम्पत्याला मदत न करता मोटारचालक पसार
Pune Accident
Pune Accident : “अचानक डंपरचा मोठा आवाज आला, आम्ही जागेवरुन उठून पुढे जाईपर्यंत…”, प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?
Shocking video A car drags a cow calf walking across the road for 200 meters watch what happened next
सांगा चूक कोणाची? कारने रस्त्यावरून चालणाऱ्या गायीच्या वासराला २०० मीटरपर्यंत ओढत नेले; VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका
Youth killed after being hit by vehicle Mumbai news
वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून तरुणाची हत्या
Murder of youth Govandi , Argument after hit by car,
मुंबई : गाडीचा धक्का लागला म्हणून खून…
death of young man walking with a Jain Sadhvi in accident
जैन साध्वी सोबत चालत जाणाऱ्या युवकाचा अपघाती मृत्यू

आशीर्वाद गोवेकर (वय ५२), रेश्मा आशिर्वाद गोवेकर (वय ४७) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. याप्रकरणी मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत प्रसाद गोवेकर (वय ५४, रा. शिव पार्वती मंगल कार्यालयाजवळ, गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आणखी वाचा-धनकवडीत दहशत माजवून वाहनांची तोडफोड; टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार आशीर्वाद आणि त्यांची भावजय रेश्मा लोहगाव परिसरातील संजय पार्क परिसरातून गुरुवारी निघाले होते. त्यावेळी भरधाव मोटारीने दुचाकीस्वार गोवेकर दाम्पत्याला धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार आशीर्वाद यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या सहप्रवासी रेश्मा यांचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय संकेश्वरी यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक साहेबा पोटे तपास करत आहेत.

Story img Loader