पुणे : दारू पिताना झालेल्या वादातून मित्राचा खून करून पसार झालेल्या दोघांना लोणीकंद पोलिसांनी अटक केली. वाघोलीतील केसनंद रस्त्यावर एका सोसायटीसमोर ही घटना घडली होती.

राम सुभाष श्रीरामे (वय २२), गोपाल नाना कोतलापुरे (वय २६, दोघे मूळ रा. नांदेड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावो आहेत. शैलेंद्र अप्पा मंडगीकर (वय २४) असे खून झालेल्याचे नाव आहे. श्रीरामे, मंडगीकर, कोतलापुरे केसनंद रस्त्यावरील सिट्राॅन सोसायटीसमोर दारू पित होते. त्यावेळी मजुरीचे पैसे न दिल्याने त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी दोघांनी धारदार शस्त्राचे वार करून शैलेंद्रचा खून केला. त्यानंतर श्रीरामे आणि कोतलापुरे पसार झाले.

A case has been filed against parents in the case of forced marriage of a minor girl Pune news
अल्पवयीन मुलीचा बळजबरीने विवाह प्रकरणी आई-वडिलांसह सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल; पीडिता गर्भवती झाल्यानंतर प्रकार उघड
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Moin Khan father of Azam khan criticizes PCB Former Chief Ramiz Raja
‘फक्त एका सामन्यानंतर…’, मुलावर झालेल्या अन्यायासाठी मोईन खानने रमीझ राजाला धरले जबाबदार; म्हणाला, ‘त्याने युवा…’
young man killed due to argument happen during joking an incident in Uttamnagar area
चेष्टा मस्करीतून झालेल्या वादातून तरुणाचा खून, उत्तमनगर भागातील घटना
case has been registered against two people due to filming done before the suicide
आत्महत्येपूर्वी केलेल्या चित्रीकरणामुळे दोघांविरोधात गुन्हा दाखल
Rape on Finance News
Rape on Finance : लग्न ठरलेल्या पत्नीवर होणाऱ्या पतीने केला जनावराप्रमाणे चावे घेऊन बलात्कार, त्यानंतर मित्रांकडे सोपवलं आणि..
police arrest five for killing 28 year old man in pimpri chinchwad
बायकोच्या अंगावर फेकलेल्या चिठ्ठीचा जाब विचारणाऱ्या पतीचा खून
Youth dies in dog attack Mumbai news
मुंबई: श्वानाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू

हेही वाचा – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र कुलगुरू निवडीवर विजय वडेट्टीवार यांची टीका, नियुक्ती तत्काळ रद्द करण्याची मागणी

हेही वाचा – पुणे : कोंढव्यातील महाविद्यालय परिसरात गोळीबार?

लोणीकंद पोलीस ठाण्यातील तपास पथकाकडून दोघांचा शोघ घेण्यात येत होता. श्रीरामे तुळजापूर येथे नातेवाईकांकडे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर एक पथक तेथे गेले. त्यांनी त्याला तेथे अटक केली. तर कोतलापुरे याला वाघोली परिसरातून अटक करण्यात आली. लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने ही कामगिरी केली.