दरोडा प्रतिबंधक पथकाने दोन सराईत गुन्हेगारांना पकडून त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त केली आहे.
सोमनाथ सदाशिव थोपटे (वय २८, रा. शुक्रवार पेठ) आणि मंगेश दिलीप धुमाळ (वय २७, रा. शिंदे आळी, शुक्रवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दरोडा प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक रघुनाथ फुगे यांना बाजीराव रस्त्यावरील टेफीफोन एक्सचेंजसमोर दोन व्यक्ती मोटारसायलवरून जात असून त्यांच्याकडे पिस्तूल आहेत, अशी माहिती खबऱ्याकडून मिळाली. त्यानुसार फुगे आणि पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कोल्हे यांच्या पथकाने शुक्रवारी दुपारी सापळा रचून दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी त्यांच्याकडे दोन पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे आणि मोटारसायकल असा एकूण एक लाख ४० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. धुमाळ यांच्यावर खुनाचा आणि मारहाण केल्याचा गुन्हा भोर पोलीस ठाण्यात दाखल आहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा