पिंपरी : चिखली येथील दोन रबर कंपन्या आगीत भस्मसात झाल्या. गुरुवारी सकाळी ही घटना घडली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.चिखली-पवार वस्ती येथे वीरभ सस्पेंशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची पाच हजार चौरस फुटामध्ये तीन शेड आहेत. आर. के. ट्रेडर्स या कंपनीचे दोन हजार चौरस फुटामध्ये एक शेड आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये रबरपासून विविध प्रकारची साधने बनवली जातात. गुरुवारी सकाळी वीरभ सस्पेंशन कंपनीत आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच महापालिका मुख्य अग्निशमन केंद्रासह चिखली, तळवडे, प्राधिकरण, पिंपरी, थेरगाव, मोशी अग्निशमन केंद्राचे ११ बंब घटनास्थळी दाखल झाले. ५९ जवानांनी दुपारी साडेबारापर्यंत आग आटोक्यात आणली. मात्र, रबर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आग धुमसत होती. त्यामुळे खबरदारी म्हणून अग्निशमन बंब तैनात ठेवले होते. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा