Massive Accident in Pune भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार वडील आणि दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना सोमवारी सकाळी चाकण-शिक्रापूर रस्त्यावर घडली. नागरिकांनी ट्रकचालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ट्रकचालकाने मद्यप्राशन केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> पुणे स्टेशन परिसरात नशेबाज चोरट्यांची दहशत; पैसे देण्यास नकार दिल्याने एकावर ब्लेडने वार
अपघातात दुचाकीस्वार वडील गणेश खेडकर, मुलगा तन्मय, शिवम यांचा मृत्यू झाला आहे. तन्मय तिसरी शिक्षण घेत होता. त्याचा लहाना भाऊ शिवम दुसरीत होता. याप्रकरणी ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ट्रकचालकाने मद्यप्राशन केल्याचा आरोपी नागरिकांनी केला आहे. वैद्यकीय तपासणीनंतर त्याने मद्यप्राशन केले किंवा नाही, याबाबतची माहिती समजू शकेल, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार गणेश खेडकर सोमवारी सकाळी मुले तन्मय आणि शिवम यांना घेऊन चाकण-शिक्रापूर रस्त्याने निघाले होते.
हेही वाचा >>> स्वारगेट भागात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; पोलिसांकडून महिलेला अटक
पिंपळे जगताप गावाजवळ चारा वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार खेडकर यांच्यासह दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. ग्रामस्थांनी ट्रकचालकाला पकडून शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात दिले. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनी घटनास्थळी भेट दिली. अपघातात दुचाकीस्वार वडिलांसह दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्यानंतर परिसरात गावात शोककळा पसरली.