पुणे : पुण्याच्या शिरगावमध्ये गांजा आणि उत्तेजक इंजेक्शन विकणाऱ्या दोघांना शिरगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून १४५ इंजेक्शनच्या बाटल्या आणि काही प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला आहे. एकूण १ लाख २१ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी सुमित गणेश पिल्ले आणि चैतन्य उमेश कुऱ्हाडे या दोघांना शिरगाव पोलिसांनी अटक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नशा करण्यासाठी आणि बॉडी बिल्डिंगसाठी वापरण्यात येणारे उत्तेजक इंजेक्शन विकण्यासाठी आरोपी सुमित आणि चैतन्य हे येणार असल्याची माहिती शिरगाव पोलिसांना मिळाली. त्यानंतर दोन्ही आरोपींना शिरगाव परिसरातूनच सापळा रचून अटक करण्यात आलं. आरोपींकडून बेकायदेशीर विक्री करण्यासाठी आणलेल्या इंजेक्शनच्या १४५ बाटल्या आणि काही प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला आहे. आरोपींकडून जप्त करण्यात आलेलं इंजेक्शन हे मेफेनटरमाईन सल्फेट असल्याचं समोर आलं असून ते उत्तेजक इंजेक्शन म्हणून ओळखलं जातं. या इंजेक्शनद्वारे अनेकजण नशा करतात.

हेही वाचा : पुण्याच्या मावळमध्ये पवना नदीच्या काठावर सुरू होता गावठी हातभट्टीचा गोरख धंदा, पोलिसांनी मारला छापा!

हेही वाचा : पुणे: ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवून व्यावसायिकाची ५३ हजारांची लूट

त्याचबरोबर बॉडी बिल्डिंगसाठी देखील हे इंजेक्शन वापरलं जातं. डॉक्टरांच्या परवानगीशिवाय हे उत्तेजक इंजेक्शन वापरल्यास किंवा कोणाला टोचवल्यास त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात, अशी माहिती देखील पोलिसांनी दिली आहे. ही कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली शिरगाव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ यांच्या टीमने केली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two sellers of stimulating mephentermine sulphate injections are arrested by pune police kjp 91 css