मावळमधील कुसगाव डॅममध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा मृत्यू झाला आहे. एकूण सहा विद्यार्थी पोहण्यासाठी कुसगाव डॅममध्ये गेले होते. त्यापैकी दोघे जण बुडाल्याची माहिती समोर आली आहे. शशांक सिन्हा आणि रविकुमार सोनी अशी मृतांची नावे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मृत दोन्ही विद्यार्थी आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील इंजिनिअरिंगचे विद्यार्थी होते. पोहण्यासाठी डॅममध्ये उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांनी दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकुर्डी येथील डॉ. डी.वाय.पाटील इंजिनिअरिंगचे सहा विद्यार्थी कुसगाव येथील डॅममध्ये पोहण्यासाठी आणि बोटिंग करण्यासाठी गेले होते. दरम्यान, सकाळी दहाच्या सुमारास सहा मित्र डॅममध्ये उतरले, पैकी समोर असलेल्या तिघांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि ते बुडायला लागले. त्यांच्यातील एकाला वाचण्यात त्यांच्या मित्रांना यश आले. मात्र, शशांक आणि रविकुमारचा बुडून मृत्यू झाला आहे.

स्थानिक आणि पोलिसांच्या मदतीने त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. दोघे ही बिहार येथील असून त्यांच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांनी दिली आहे. 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two students drowned in kusgaon dam pune kjp 91 hrc