पवना धरणात दोन विद्यार्थी बुडाले आहेत. पाण्याचा अंदाज न आल्याने हे विद्यार्थी बुडाल्याचे पोलिसांनी म्हटले.  ही घटना आज सायंकाळी साडेसहा वाजता घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, पवना धरण परिसरातील ब्राह्मणोली गावाच्या हद्दीत फिरायला गेलेले दोन विद्यार्थी बुडाले आहेत. जितेश पगार आणि अनिकेत निकम अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. पुण्याच्या विविध महाविद्यालयातील ६ विध्यार्थी आज फिरायला गेले होते, त्यातील दोघे धरणातील पाण्यात खेळायला उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जितेश पगार हा नाशिक तर अनिकेत निकम हा साक्री-धुळेचा असून ते पुण्यात शिक्षणासाठी राहत होते. अद्याप ते दोघे सापडले नाहीत. हे दोघे सिंहगड कॉलेज आणि कर्वेनगर येथील कॉलेजचे विद्यार्थी असल्याचे पोलिसांनी म्हटले. पोलीस आणि स्थानिक त्यांचा शोध घेत आहेत. रात्री उशिरा पर्यंत शोधकार्य सुरू होते. मात्र त्या ठिकाणचे पाणी खोल आहे यामुळे सध्या अंधार झाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले आहे. उद्या परत सकाळी शोधकार्य सुरू ठेवणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.