पुणे : पुण्याच्या तळेगाव दाभाडे येथे दुर्गामाता मंदिरात अज्ञात दोन चोरट्यांनी दानपेटी पळवली. चोरट्यांनी काही अंतरावर जाऊन दानपेटी फोडून त्यातील पैसे घेऊन पोबारा केला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस अधिक तपास करत आहेत. ही घटना दोन दिवसांपूर्वी पहाटेच्या सुमारास घडली आहे.
हेही वाचा – पुणे : घरीच करा हुरडा पार्टी; बाजारात हुरड्याची पाकिटे उपलब्ध, जाणून घ्या दर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे येथे दुर्गा मंदिर असून पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला. मंदिरात आणि परिसरात कोणीही नसल्याची खात्री केली. अवघ्या तीस सेकंदात अज्ञात दोघांनी मंदिरातील दान पेटी पळवून काही अंतरावर ती फोडली आणि त्यातील पैसे घेऊन पसार झाले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून तळेगाव दाभाडे पोलीस अधिक तपास करत आहेत. दानपेटीत किती पैसे होते हे अद्याप समजू शकले नाही. मंदिरात चोरी झाल्याने सर्वसामान्य नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.