चोरीच्या पैशांतून मुंबईतील हाॅटेलमध्ये माैजमजा करणाऱ्या चोरट्यांना गुन्हे शाखेने गजाआड केले. चोरट्यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील ११ दुकानांचा दरवाजा उचकटून चोरी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. विकास उर्फ जंगल्या दिलीप कांबळे (वय २७, रा. पवार वस्ती, कुदळवाडी, चिखली) आणि अजय चेलाराम राम ( वय २०, रा. बाैध्दनगर, पिंपरी) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- VIDEO: “अगदी स्पष्ट सांगायचं तर गोरे यांच्या पत्नीने…”, रुग्णालयात जाऊन भेट घेतल्यानंतर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचं विधान

विश्रांतवाडी भागात गुन्हे शाखा युनिट चारचे पथक गस्त घालत हाेते. त्यावेळी जंगल्या कांबळे आणि साथीदार आळंदी रस्त्यावरील बसथांब्यावर थांबल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. पाेलीस निरीक्षक गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विकास जाधव, उपनिरीक्षक जयदीप पाटील, महेंद्र पवार, अजय गायकवाड, प्रवीण भालचिम, सारस साळवी, विठ्ठल वाव्हळ मनाेज सांगळे आदींनी सापळा लावून दाेघांना ताब्यात घेतले. तपासात त्यांनी रात्रीच्या वेळी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील बंद दुकानांचा दरवाजा उचकटून चोरी केल्याची माहिती दिली. चोरट्यांकडून दुचाकी आणि रोकड असा दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा- पुणे: पहाटे पाच वाजेपर्यंत ‘चिअर्स’; नाताळ, नववर्ष स्वागतानिमित्त मद्यालये पहाटे पाच वाजेपर्यंत खुली

चोरीच्या पैशातून मुंबईत माैजमजा

जंगल्या कांबळे आणि त्याचा साथीदार अजय राम दाेघे सराईत चोरटे आहेत. दुकाने फोडून मिळालेल्या पैशांतून दोघे जण मुंबईत जाऊन महागड्या हाॅटेलमध्ये वास्तव्य करायचे. मुंबईत मौजमजा करायचे, असे पोलिसांनी सांगितले. दोघांनी फरासखाना, विश्रामबाग, चतु:शृंगी, वाकड, चिंचवड, भाेसरी एमआयडीसी, चाकण, विश्रांतवाडी आणि विमानतळ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ११ दुकाने फोडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two thieves arrested for breaking into shops in pimpri chinchwad pune print news rbk 25 dpj
Show comments