पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागातून रिक्षा चोरणाऱ्या चोरट्यांना गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली. चोरट्यांकडून सहा रिक्षा जप्त करण्यात आल्या.
शादाब युसुफ अन्सारी (वय २१), अकील हमीद चौधरी (वय ३८, दोघे रा. सय्यदनगर, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

हेही वाचा- राज्य सरकारने लव जिहाद विरोधात कायदा करावा, त्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटणार : मिलिंद एकबोटे

खडकी, दत्तवाडी, कात्रज, कोंढवा भागातून तीन आसनी रिक्षा चोरीला गेल्या होत्या. या प्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. रिक्षा चोरटे ओैंध परिसरात थांबल्याची माहिती पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर चित्ते, सतीश कत्राळे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले.

हेही वाचा- पिंपरीः राहुल गांधींच्या कौतुकामुळे कुमार केतकरांच्या भाषणात अडथळे

दोघांनी शहराच्या वेगवेगळ्या भागातून सहा रिक्षा चोरल्याची माहिती तपासात उघड झाली. चोरट्यांकडून सहा रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. दोघांना खडकी न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक अनिता मोरे, उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, संतोष क्षीरसागर, रामदास गोणते आदींनी ही कारवाई केली.

Story img Loader