मौज मजा आणि दारू पिण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या जय आणि विरुला पिंपरी- चिंचवडच्या देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांची मूळ नाव आकाश जाधव आणि आशुतोष घोडके आहे. आकाश आणि आशुतोष दोघेही चांगले मित्र आहेत. ते चिखली परिसरात राहतात. परंतु, मौजमजा आणि दारू पिण्यासाठी पैसे नसल्याने त्यांनी दुचाकी चोरल्याच समोर आलेल आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आकाश आणि अशितोष या दोघांनी आतापर्यंत १४ लाख ४५ हजारांच्या २१ दुचाकी वेगवेगळ्या भागातून चोरल्या आहेत. पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरातील देहूरोड, चिखली, भोसरी, निगडी, दिघी, चिंचवड, सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २१ गुन्हे उघडकीस आले आहेत. या दोन्ही आरोपींना देहूरोड बाजार परिसरातील स्वामी चौकातून अटक केली होती. दोघेही दहावी ते बारावी शिकले आहेत. ते कुठलाही काम धंदा करत नव्हते. त्यामुळे दारू पिण्यासाठी आणि मौजमजा करण्यासाठी दोघांनी दुचाकी चोरी करण्यास सुरुवात केली आणि मिळालेल्या पैशातून ते दारू प्यायचे. अशी माहिती देहूरोड पोलिसांनी दिली आहे. पिंपरी- चिंचवड शहरात ४ तर उर्वरित १७ दुचाकी बीड च्या नागझरी मध्ये मिळाल्या आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two thieves who stole a two wheeler were arrested by dehur road police of pimpri chinchwad kjp 91 amy