लोणावळा : लोणावळा शहराजवळ असलेल्या वरसोली गावात खाणीतील पाण्यात बुडून मुंबईतील दोन पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. प्रियांक पानचंद व्होरा (वय ३५, रा. पवई, मुंबई), विजय सुभाष यादव (वय ३५, रा. घाटकोपर, मुंबई) अशी मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांची नावे आहेत. प्रियांक, विजय आणि त्यांचे मित्र लोणावळा परिसरात शनिवारी (८ जुलै) वर्षाविहारासाठी आले होते.

हेही वाचा >>> जेजुरीतील माजी नगरसेवकाच्या खून प्रकरणातील आरोपींना पुण्यात अटक

Crime NEws
कुवैतहून थेट मध्य प्रदेश गाठलं अन् मुलीवर लैंगिक शोषण करणाऱ्याचा घेतला जीव; मृत्यूचं गुढ उकलायला वडिलांनीच केली मदत!
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
CSMT accident Accused in accident finally found after CCTV examination
सीएसएमटी अपघात : सीसीटीव्हीच्या तपासणीनंतर अखेर अपघातातील आरोपी सापडला
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
Atul Suhas Suicide
“न्याय प्रलंबित आहे”, गळ्यात फलक लटकावून तरुणाची आत्महत्या; २४ पानी नोटमुळे पोलिसांसमोर आव्हान वाढले!
gold from woman dead body s neck was stolen
मृत्यूनंतरही परवड थांबली नाही, पार्थिव रुग्णालयात नेताना महिलेच्या गळ्यातील गंठण चोरीला

लोणावळा शहराजवळ असलेल्या वरसोली गावातील खाणीत पाणी आहे. सायंकाळी सातच्या सुमारास खाणीतील पाण्यात प्रियांक, विजय, जेनिया वियागस उतरले. खाणीतील दगडावरुन त्यांचा पाय घसरला आणि तिघे जण पाण्यात बुडाले. तिघे जण खाणीतील पाण्यात बुडाल्याचे मित्रांनी पाहिल्यावर त्यांनी आरडओरडा केला. ग्रामस्थांनी तिघांना तातडीने पाण्यातून बाहेर काढले. नाका-तोंडात पाणी शिरल्याने प्रियांक आणि विजयचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तपासणीत उघडकीस आले. या घटनेची माहिती नातेवाईकांना देण्यात आली. शवविच्छेदनानंतर दोघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद लोणावळा पोलिसांनी केली आहे. पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्य मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर पवार तपास करत आहेत.

Story img Loader