पुणे : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर बोपोडी ते फुटबॉल मैदान (सीएफव्हीडी) दरम्यान दुचाकी आणि तीनचाकी वाहनांसाठी प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेल्या दुहेरी वाहतुकीचे आदेश रद्द करण्यात आले आहेत. या भागात मेट्रो स्थानकाचे काम सुरू आहे. दुहेरी वाहतुकीमुळे कोंडी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर पुण्याकडे जाणारी वाहतूक बोपोडी, खडकी बाजारमार्गे पुण्याकडे वळविण्यात आली आहे.
हेही वाचा >>> माजी खासदार आढळराव पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ सोडणार?
मेट्रोच्या कामामुळे दोन वर्षांपूर्वी बोपोडी चौकातून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन पुण्याकडे जाणारी वाहतूक बोपोडी चौकमार्गे खडकी बाजारकडे वळविण्यात आली आहे. ६ एप्रिलपासून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील बोपोडी चौक ते फुटबॉल मैदान दरम्यान दुचाकी, तीन चाकी वाहनांना वाहतुकीस परवानगी देण्यात आली होती. खडकी भागात मेट्रो स्थानकाचे काम सुरू असल्याने दुचाकी, तीनचाकी वाहनांसाठी देण्यात आलेला आदेश रद्द करण्यात आला आहे.
चर्च चौक ते बोपोडी चौक दरम्यान जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू होणार आहे. या भागात दुहेरी वाहतूक सुरू ठेवल्यास वाहतूक कोडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रायोगिक तत्वावर दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाटी सुरू करण्यात आलेली दुहेरी वाहतुकीचे आदेश रद्द करण्यात येत असल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.
हेही वाचा >>> पिंपरी- चिंचवड, उर्से, शिक्रापूर ‘अंधारात’…अतिउच्चदाबाच्या वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित
बोपोडी चौकातून जुन्या मुंबई- पुणे महामार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांना मनाई करण्यात आली आहे. वाहनचालकांनी बोपोडी चौकातून खडकी बाजारमार्गे पुण्याकडे जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.