लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना उत्तमनगर परिसरात घडली. याप्रकरणी टेम्पोचालकाविरुद्ध उत्तमनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
phulambri Fire shop, phulambri, Fire in a shop,
छत्रपती संभाजीनगर : फुलंब्रीतील दुकानात आगीनंतर भडका; तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
Khed Parshuram Ghat accident, Khed Parshuram Ghat,
खेड परशुराम घाटात दाट धुक्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात; वाहनांचे मोठे नुकसान तर जीवितहानी टळली
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
vegetable vendor Murder, Murder at Mira Road,
मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या

यश सुरेश तनपूरे (वय २१, रा. उत्तमनगर) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत यशचा मित्र निखिल वानखेडे (वय २०, रा. उत्तमनगर) याने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार यश आणि निखिल सोमवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास महाविद्यालयात निघाले होते. उत्तमनगर परिसरात भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार यश गंभीर जखमी झाला.

आणखी वाचा-पुणे : पाण्याविना नवीन गृहप्रकल्प कशासाठी?

अपघातानंतर घटनास्थळी न थांबता टेम्पोचालक पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या यशला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तो मरण पावला होता. अपघातानंतर पसार झालेल्या टेम्पोचालकाचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक अमृता चवरे तपास करत आहेत.