लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : पुनावळेतील कचरा भूमीची आरक्षित जागा महापालिकेने वन विभागाकडून ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू करताच स्थानिक नागरिकांनी विरोधाचा सूर आळवण्यास सुरुवात केली आहे. कचरा डेपोला विरोध करण्यासाठी पुनावळे, मारुंजी, ताथवडे, जांबे, हिंजवडी, वाकड आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी रविवारी ५ नोव्हेंबर दुचाकी रॅली काढली. दरम्यान, कचरा डेपो होऊ देणार नसल्याची आंदोलकांना ग्वाही देत नगरसेवक नसल्याने प्रशासन ढिम्म झाले आहे. आयुक्त फोन उचलत नाहीत असा हल्ला आमदार अश्विनी जगताप यांनी प्रशासनावर केला.

PMC News: महापालिकेचे १०० सफाई कर्मचारी जाणार इंदूरला हे आहे कारण !
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Who collected penalty of 60 lakhs in month from people who throw garbage
कचरा करणाऱ्यांकडून एका महिन्यात ६० लाखांची दंडवसुली कोणी केली?
Commissioner orders surgical strike on encroachments to break traffic jam
कोंडी फोडण्यासाठी आयुक्त रस्त्यावर, अतिक्रमणांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’चे आदेश
bmc plans to concrete all roads but residents oppose concreting in their area
आम्हाला काँक्रिटिकरण नको, वांद्रे आणि मरीन ड्राईव्हच्या राहिवाशांची मागणी
debt collectors false case news in marathi
जबरी चोरीचा बनाव करणाऱ्या कर्मचाऱ्याला बेड्या
Vasai Virar Municipal Solid Waste Management Project marathi news
‘पैसे नाहीत, असे कसे म्हणता?’, महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
guillain barre syndrome patients pune municipal corporation report survey
‘ त्या ‘ गावांना शुद्ध पाणी पुरविणे गरजेचे, काय म्हंटले नक्की महापालिकेच्या अहवालामध्ये ?

पिंपरी-चिंचवड शहरात दररोज १२०० टन ओला आणि सुका कचरा जमा होतो. हा कचरा संकलित करून मोशीतील ८१ एकर परिसरातील कचरा डेपोत टाकला जातो. परंतु, मोशी डेपोची मर्यादा संपुष्टात आली आहे. त्यामुळे महापालिकेने पुनावळेतील आरक्षित जागेवर कचरा डेपो विकसित करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. शहर वाढत असून कचरा वाहतुकीचे अंतर जास्त आहे. पुनावळेत कचऱ्याचे डोंगर उभारले जाणार नाहीत. अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून प्रक्रिया केली जाईल. बफर झोन निश्चित केल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते. प्रशासनाकडून जागा ताब्यात घेऊन डेपो विकसित करण्याची हालचाल सुरू करताच नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

आणखी वाचा-पुणे : पिस्तूल बाळगणाऱ्या गुंडाला कोंढव्यात अटक, पिस्तुलासह काडतुसे जप्त

कचरा डेपोला विरोध करण्यासाठी पिंपरी-चिंचवड को ऑपरेटिव्ह सोसायटी फेडरेशन आणि पुनावळे रेसिडेंट्स एसोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी दुचाकी रॅली काढण्यात आली. पुनावळे येथून या रॅलीला सुरुवात झाली. कोयते वस्ती, शिंदे वस्ती, लाईफ रिपब्लिक सोसायटी मारुंजी, लक्ष्मी चौक, भूमकर चौक, ताथवडे सेवा रस्ता मार्गे काटे वस्ती येथील जंगल परीसरात दुचाकी रॅली काढली. जंगलातील प्रत्येक झाडाला आलिंगन देत नागरिकांनी चिपको आंदोलन केले. पुनावळे आमच्या हक्काचे-नाही कुणाच्या बापाचे, कचरा डेपो हटाव-पुनावळे बचाव, कचरा डेपो हटवा-पुनावळे वाचवा, अशा घोषणा देत शेकडो नागरिकांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला.

आणखी वाचा-लाॅरेन्स बिष्णोई टोळीतील शार्पशुटर संतोष जाधवच्या नावाने कोथरूडमधील व्यावसायिकाकडे खंडणी

कचरा डेपो होऊ देणार नाही. या ठिकाणी ऑक्सिजन पार्क व्हायला हवे. महिला, वृद्धांना इथे फिरता येईल. तरुणांना विविध उपक्रम राबवता येतील. आगामी अधिवेशनात हा मुद्दा उचलून धरणार आहे. महापालिकेचे नाक दाबले की तोंड उघडते. नगरसेवक नसल्याने प्रशासन ढिम्म झाले आहे. आयुक्त फोन उचलत नाहीत. -अश्विनी जगताप, आमदार

पुनावळेतील जंगल हे नागरिकांसाठी ऑक्सिजन पार्क आहे. कचरा डेपो झाल्यास नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल. मागील काही दिवसांपासून आम्ही हा प्रकल्प रद्द करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करीत आहोत. त्यासाठी स्थानिक आमदार आणि लोकप्रतिनिधींनी शासनाकडे पाठपुरावा करावा. -सचिन लोंढे,स्थानिक नागरिक

Story img Loader