परराज्यातून येऊन शहरात दुचाकी चोरीचे गुन्हे करणाऱ्या चोरट्याला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. चोरट्याकडून चार दुचाकी जप्त करण्यात आल्या.इम्रान सिराजउद्दीन अन्सारी (वय २९, सध्या रा. दांडेकर वस्ती, येवलेवाडी, कोंढवा, मूळ रा. खजोरी, जि. देवघर, झारखंड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. अन्सारी शहरात मजुरी करण्यासाठी आला होता. त्यानंतर त्याने दुचाकी चोरीचे गुन्हे करण्यास सुरुवात केली. बिबवेवाडी भागातून त्याने नुकतीच एक दुचाकी लांबविली होती. पोलिसांचे पथक बिबवेवाडी भागात गस्त घालत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>>पुणे: नवमतदारांच्या नोंदणीसाठी आज महाविद्यालयांमध्ये विशेष शिबिर

त्या वेळी पोलिसांच्या पथकाने अन्सारीला पकडले. तपासात त्याने बिबवेवाडी परिसरातून तीन तसेच वारजे भागातून एक दुचाकी लांबविल्याची माहिती मिळाली. अन्सारीकडून चार दुचाकी जप्त करण्यात आल्या. पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, सहायक आयुक्त पौर्णिमा तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता जाधव, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीत्रक अनिता हिवरकर, सहायक निरीक्षक प्रवीण काळुखे, रवींद्र राऊत, संतोष जाधव, शिवाजी येवले, प्रणय पाटील आदींनी ही कारवाई केली.