संजय जाधव, लोकसत्ता
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पुणे: देशात ई-वाहनांच्या विक्रीतील वाढ कायम आहे. यंदाही ई-वाहनांच्या विक्रीचा वेग वाढला आहे. चालू वर्षातील पहिल्या तीन महिन्यांत ई-वाहनांच्या विक्रीने दरमहा एक लाखांचा टप्पा पार केला आहे. ई-वाहनांमध्ये सर्वाधिक मागणी दुचाकी आणि तीनचाकीला आहे.
सोसायटी ऑफ मॅन्युफॅक्चरर्स ऑफ इलेक्ट्रिक व्हेईकल्स (एसएमईव्ही) या संघटनेने ई-वाहनांच्या विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. जानेवारी ते ४ एप्रिल दरम्यानची देशातील ई-वाहनांच्या विक्रीची ही आकडेवारी आहे. यानुसार जानेवारी महिन्यात देशात १ लाख २ हजार ५१४ ई-वाहनांची विक्री झाली. त्यामध्ये दुचाकी सर्वाधिक ६४ हजार ६४१ होत्या. त्याखालोखाल तीनचाकी ३४ हजार ३०४ होत्या. चारचाकी आणि बसची विक्री अनुक्रमे ३ हजार ४७१ आणि ९८ होती.
आणखी वाचा- पुणे : नगर रस्त्यावर अमली पदार्थ विक्रेत्यांना पकडले; २१ किलो गांजा जप्त
फेब्रुवारी महिन्यात देशात १ लाख ६ हजार ८८९ ई-वाहनांची विक्री झाली. त्यात सर्वाधिक ६५ हजार ९८२ दुचाकींची विक्री झाली. त्यापाठोपाठ तीनचाकी वाहनांची विक्री ३५ हजार ९९५ झाली. चारचाकीची विक्री ४ हजार ८१३ तर बसची विक्री ९९ झाली. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात ई-वाहनांची विक्री एक लाखाच्या पुढे असली तरी त्यात मोठी तफावत नव्हती.
आणखी वाचा- पुणे मेट्रो स्थानकांच्या कामातील त्रुटी दूर, महामेट्रोची माहिती
मार्चमध्ये मात्र जानेवारी आणि फेब्रुवारीच्या तुलनेत विक्रीत मोठी वाढ झाली. मार्चमध्ये ई-वाहनांची विक्री १ लाख ३९ हजार ८४१ वर पोहोचली. त्यात दुचाकींच्या विक्रीतही वाढ होऊन ती ८५ हजार ८५९ वर गेली. तीनचाकींची विक्री ४५ हजार २२१ वर पोहोचली. चारचाकींची विक्री ८ हजार ६७१ तर बसची विक्री ९० झाली. एप्रिल महिन्यात ४ तारखेपर्यंत एकूण ९ हजार ६६३ वाहनांची विक्री झाली. यात दुचाकी ६ हजार २५९, तीनचाकी २ हजार ९०८, चारचाकी ४६१ आणि बस ३५ अशी विक्री झाली.
ई-वाहनांची संख्या पाच टक्क्यांवर जाईल
देशातील एकूण वाहन संख्येत ई-वाहनांची संख्या १ टक्क्याहून कमी आहे. पुढील काही वर्षांत हे प्रमाण ५ टक्क्यांवर पोहोचेल. सध्या ई-वाहनांमध्ये दुचाकींची संख्या अधिक आहे. सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सवलतींनुसार विक्रीत चढउतार होत आहेत. देशातील रस्त्यांवर धावणाऱ्या ९० टक्के ई-स्कूटर या कमी वेगाच्या असल्याने (ताशी २५ किलोमीटर) त्यांच्या नोंदणीची गरज पडत नाही, असे सोसायटी ऑफ मॅन्युफॅक्चरर्स ऑफ इलेक्ट्रिक व्हेईकल्सने (एसएमईव्ही) म्हटले आहे.