पिंपरी: रहदारीचा रस्ता सिमेंटीकरणासाठी महिनाभरापासून खोदून ठेवल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे कासारवाडीत एका दोन वर्षांच्या मुलाचा नाहक बळी गेल्याची घटना घडली. त्यानंतरही महापालिका व पोलीस प्रशासनाकडून अपेक्षित कारवाई झाली नसल्याची तक्रार या भागातील नागरिकांनी केली आहे.
व्यंकटेश शंकर डोकडे (रा. मंजूळकर चाळ, कासारवाडी) असे दुर्दैवी बालकाचे नाव आहे. मूळचा नाशिकचा असणारा व्यंकटेश सुट्टीसाठी आजोबांकडे आला होता. बुधवारी सकाळी घराजवळ तो खेळत होता. मुळातच अरुंद असलेल्या रस्त्यावर भरधाव आलेल्या चारचाकी वाहनाने धडक दिल्याने व्यंकटेशचा जीव गेला. तीन बहिणींनंतर झालेला एकुलता एक मुलगा म्हणून व्यंकटेश नात्यागोत्यात सर्वांचा लाडका होता. त्याचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ करण्यात येत आहे.
हेही वाचा >>> पुणे जिल्ह्याची रणनीती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ठरवणार; विकासकामांचा दरमहा आढावा
कासारवाडी-पिंपळे गुरव मार्गांवरील रस्त्यांचे सिमेंटीकरण सुरू आहे. त्यासाठी महिनाभरापासून रस्ता खोदून ठेवला आहे. अपुरी जागा व वाहनांची संख्या जास्त, त्यामुळे सततची कोंडी, त्यातून होणाऱ्या वादविवादांनी परिसरातील नागरिक वैतागले आहेत. नेहमीचा वाहतुकीचा रस्ता खोदाईमुळे बंद झाला. त्याची पूर्वसूचना देण्यात आली नाही. पालिका अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही पर्यायी व्यवस्था झाली नाही. त्यामुळे दिसेल त्या रस्त्याने (गल्लीबोळात) वाहने जाऊ लागली आहेत. अशाचप्रकारे मंजाळकर चाळीतील १२ फुटी रस्त्यावरून आरोपी वाहनचालक वेगाने जात होता. तेव्हा घराजवळ खेळणारा व्यंकटेश गाडीच्या चाकाखाली आला, त्यातच त्याचा जीव गेला. पुढील तपास सुरू असल्याचे भोसरी पोलिसांनी सांगितले.
पालिका अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष
खोदलेल्या रस्त्यांमुळे नागरिकांना त्रास होत असल्याचे पालिकेचे उपअभियंते सुनील दांगडे यांना अनेकदा सांगितले होते. गतिरोधक बसवण्याची विनंतीही केली होती. मात्र, त्यांनी साफ दुर्लक्ष केले. अजूनही हा रस्ता धोकादायक आहे, इतरांच्या जिवाला धोका होऊ शकतो, अशी प्रतिकिया व्यंकटेशचे आजोबा बबन मंजाळकर यांनी दिली.