विवाहासाठी तरुणीसह तिच्या बहिणीला धमकावून मोटारीतून अपहरण करण्यात आल्याची घटना स्वारगेट परिसरातील जेधे चौकात घडली. तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपींनी तिला डांबून ठेवले. तरुणी आणि तिच्या बहिणीला सदाशिव पेठेत सोडून अपहरणकर्ते पसार झाले. स्वारगेट पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास करुन दोघांना अटक केली.
हेही वाचा >>>कसबा पोटनिवडणूक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बैठकीसाठी मुलांना एक तास अगोदर शाळेतून सोडले
या प्रकरणी सोमनाथ सुनील सूळ (वय २५), गणेश बापुराव महानवर (वय ३०, दोघे रा. केसनंद फाटा, वाघोली, नगर रस्ता) यांना अटक करण्यात आली. याबाबत एका तरुणीने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विनयभंग, अपहरण, धमकावणे या कलमांन्वये आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी तरुणी आणि आरोपी सोमनाथ ओळखीचे आहेत. दोघे एकाच गावात राहायला आहेत. दोघांचे प्रेमसंबंध होते. सोमनाथचा स्वभाव न पटल्याने तरुणीने त्याचाशी असलेले प्रेमसंबंध तोडले. त्यानंतर तरुणीने विवाह केला. पतीशी वाद झाल्याने तिने घटस्फोट घेतला. तरुणी खासगी नोकरी करत असून ती स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे.
हेही वाचा >>>वानवडीत महावितरणच्या रोहित्राला आग
दरम्यान, सोमनाथ तरुणीला विवाहासाठी धमकावत होता. तिच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून तो तिला त्रास देत होता. तरुणी एका खासगी कंपनीत काम करत आहे. सोमनाथने कंपनीत संपर्क साधला. तरुणीला भेटण्यासाठी त्याने बोलावले. सोमनाथ त्रास देण्याची शक्यता वाटल्याने तरुणी बहिणीसह शनिवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास स्वारगेट परिसरातील जेधे चौकात आली. त्यानंतर सोमनाथ आणि साथीदार गणेशने तरुणी आणि तिच्या बहिणीला धमकावले. दोघींना धमकावून मोटारीत बसवण्यास सांगितले. रात्रभर दोघींना मोटारीतून वेगवेगळ्या भागात नेले. वाघोली, जेजुरी परिसरात दोघींना नेण्यात आले. रविवारी सकाळी तरुणी आणि तिच्या बहिणीला सदाशिव पेठेत सोडून सोमनाथ आणि साथीदार गणेश पसार झाले.
विवाह न केल्यास वाईट परिणाम होतील. तसेच तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी सोमनाथने दिली. घाबरलेल्या तरुणीने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने तपास सुरू करण्यात आला. सोमनाथ आणि साथीदार गणेश यांना अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक जमदाडे तपास करत आहेत.