पिंपरी-चिंचवडमध्ये इन्स्टाग्रामवर अश्लील आणि धमकी देणारे व्हिडिओ पोस्ट करणे हे दोन तरूणी आणि एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. त्यांच्या  विरोधात पोलिसांनी कठोर पाऊल उचलत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी एका तरुणीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अश्लील भाषेचा वापर करून व्हिडिओ बनवून ते इन्स्टाग्रामवर पोस्ट करून लाईक आणि शेअर मिळवण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. मात्र पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करत वेळीच त्यांना आवर घालण्याचा प्रयत्न केला आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साक्षी श्रीश्रीमली, कुणाल कांबळे आणि साक्षी कश्यप अशी गुन्हा दाखल झालेल्या तरूण, तरूणींची नावे आहेत. त्यांच्यावर कलम 292, 294, 506, 34 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दोन्ही तरूणींना वाकड पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील साक्षी श्रीश्रीमली या तरुणीचे थेरगाव क्वीन नावाचे इंस्टावर अकाउंट आहे. त्यात, तिने मित्र कुणाल कांबळे आणि साक्षी कश्यप नावाच्या मैत्रिणीसह अश्लील आणि धमकीचे व्हिडिओ पोस्ट केले होते. ते वाकड पोलिसांपर्यंत पोहचले. त्यातील भाषा आणि धमकीचे व्हिडिओ पाहून तरूणवर्गावर विपरित परिणाम होण्याची चिन्हे असल्याने तातडीने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

इंस्टावर लाखो, हजारो फॉलोअर्स आणि लाईक मिळण्यासाठीची त्यांची धडपड त्यांना चांगलीच महागात पडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून तरुणीला अटक करण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक संगीता गोडे या करत आहेत. 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two young women arrested for posting obscene and threatening videos on insta msr 87 kjp