पुणे : कोथरुड परिसरातून पुणे पोलिसांनी दाेन परप्रांतीय तरुणांना मंगळवारी रात्री ताब्यात घेतले. दोघांकडून काडतुसे आणि संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी या घटनेची माहिती राज्य दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) दिली आहे. दोघे कोंढवा परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली असून, त्यांचा देशविघातक कारवायांमध्ये सहभाग असल्याचा संशय पालिसांनी व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कोथरुड परिसरात वास्तव्यास असलेल्या दोन तरुणांच्या संशयास्पद हालचालींची माहिती पुणे पोलिसांच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करण्यात आली. दोघांकडून काही संशयास्पद कागदपत्रे, लॅपटाॅप, मोबाइल संच जप्त करण्यात आला आहे.

दोघांकडून काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. मात्र, त्यांच्याकडे पिस्तूल सापडले नाही. त्यांच्याकडे असलेल्या लॅपटाॅपची तपासणी करण्यात आली. तेव्हा काही संशयास्पद कागदपत्रे आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी या घटनेची माहिती एटीएसला दिली असून, पुणे पोलीस आणि एटीएसकडून दोघांची चौकशी करण्यात येत आहे.