लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्ग आणि पुणे स्टेशन परिसरातील राजा बहाद्दुर मिल रस्त्यावर अपघाताच्या घटना घडल्या.
मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्गावर भरधाव दुचाकी घसरुन सहप्रवासी तरुणाचा मृत्यू झाला. अपघातात दुचाकीस्वार तरुणाला दुखापत झाली. अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी दुचाकीस्वार तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला. दीपू परभेश राजभर (वय २१, रा. वाघजाईनगर, आंबेगाव खुर्द) असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार शोएब नयुम शेख (वय २५, रा. वाघजाईनगर, आंबेगाव खुर्द) जखमी झाला. अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस हवालदार अनिल भोसले यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आणखी वाचा-अभ्यास करत नाही म्हणून पित्यानेच केला नऊ वर्षांच्या चिमुरड्याचा खून, बारामतीमधील धक्कादायक घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार शोएब आणि त्याचा मित्र दीपू खेड शिवापूर येथे मित्राच्या पार्टीला गेले होते. ११ जानेवारी रोजी रात्री ते दहाच्या सुमारास पार्टीवरुन घरी निघाले. मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवीन बोगदा पार झाल्यानंतर काही अंतरावर गतीरोधक आल्याने एका मोटारचालकाने मोटारीचा वेग कमी केला. त्यावेळी दुचाकीस्वार शोएबने दुचाकीचा वेग कमी करण्यासाठी ब्रेक दाबला. ब्रेक दाबल्यानंतर दुचाकी घसरली. सहप्रवासी दीपू दुचाकीवरुन पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिंदे तपास करत आहेत.
आणखी वाचा-मौजमजेसाठी घरफोडी करणारा अल्पवयीन ताब्यात, दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे स्टेशन परिसरातील राजा बहाद्दुर मिल रस्त्यावर भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी मोटारचालकाविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अथर्व संभाजी पास्तापुरे (वय २१) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. याबाबत नरसिंह संजय भांडारे (वय २४, रा. आनंदवाडी, ता. चाकूर, जि. लातूर) याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांडारे याचा मामेभाऊ दुचाकीस्वार अथर्व १६ जानेवारी रोजी दुपारी पावणेबाराच्या सुमारास राजा बहाद्दुर मिल रस्त्याने निघाला होता. त्यावेळी भरधाव मोटारीने दुचाकीस्वार अथर्वला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या अथर्वचा मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता मोटारचालक पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के तपास करत आहेत.