पुण्यातील महमदवाडी येथील कृष्णानगर परिसरातील पालखी रोडवर रिल्स बनवण्याच्या नादात दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेला धडक दिल्याची घटना घडली. या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला असून, रिल्स तयार करणार्या दोघा आरोपींना वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. तसलीम फिरोज पठाण असे मृत महिलेचे नाव आहे. आयान शेख आणि झाईद शेख या दोन आरोपींना (अंदाजे वय २० ते २२ रा.सय्यदनगर) अटक करण्यात आली.
हेही वाचा – इंद्रायणीत सांडपाणी सोडू नका, अन्यथा… देहू संस्थानचा इशारा
हेही वाचा – पुण्यात दहा वर्षांच्या नातीने सोनसाखळी चोराला पळवून लावले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयान शेख आणि झाईद शेख हे दोघे तरुण महमदवाडी येथील पालखी रोडवर ६ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास दुचाकी चालवत रिल्स तयार करित होते. ते दुचाकी वेगाने चालवित होते. त्यादरम्यान तसलीम फिरोज पठाण ही महिला दुचाकीवरून घरी जात होती. तेवढ्यात तसलीम यांच्या दुचाकीला आयान शेख आणि झाईद शेख यांच्या पल्सर या दुचाकीने जोरात धडक दिली. या घटनेत तसलीम यांच्या डोक्याला जोरात मार लागला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी घटना स्थळावरून पसार झाले. पण आयान शेख आणि झाईद शेख या दोघा आरोपींना काही तासांत पकडण्यात यश आल्याचे वानवडी पोलिसांनी सांगितले.