“गुंडांचा वापर हा निवडणुकांमध्ये केला जातो. पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरात झालेल्या पोटनिवडणुकीत देखील तुरुंगातून गुंडांना सोडवले होते. गुंडांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या भेटीगाठी घेतल्या. सागर आणि वर्षा बंगल्यावर यांचा बॉस बसल्याने गुंडगिरी सुरु आहे, गोळीबार केला जात आहे, जीव घेतला जातो आहे. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा धाक राहिला नाही. केवळ ते राजकारणात गुंतलेले आहेत. हा महाराष्ट्र गुंडांचं राज्य बनला आहे ” असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> पुणे : जितेंद्र आव्हाडांनी मुंब्रा भागापुरतेच मर्यादित राहावे : राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांचे विधान

अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या चौफेर टीका केली आहे. या गुंडाचा वापर निवडणुकीत होतो, सर्वसामान्य जनतेच्या मनात धाक निर्माण करायचा आणि राजकीय हित साधायचं असा आरोप त्यांनी केला आहे. मराठा समाजाची या सरकारने फसवणूक केली आहे. म्हणूनच मनोज जरांगे पाटील यांच्यावर पुन्हा उपोषणाला बसण्याची वेळ येते आहे.

हेही वाचा >>> महाराष्ट्र हे गुंडांचं राज्य; देवेंद्र फडणवीसांचा गृहमंत्री म्हणून धाक राहिलेला नाही : अंबादास दानवे

ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप दानवे यांनी यावेळी केला. भाजप आमदार गोळीबार करत आहेत, ज्याला गोळ्या घातल्यात तोही धुतल्या तांदळाचा नाही, मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र हे वर्षा बंगल्यावर पुण्यातील कुख्यात गुंडाला भेटतात. यावर त्यांनी उत्तर द्यायला हवं. तपासणी करून आत सोडतात तरीही आशा प्रकारे गुंड जात असेल तर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.पुण्यातील गुंडांच उदात्तीकरण केलं जात आहे. हे चुकीचं आहे. असे गुंड मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जात असतील तर हे राज्य गुंडांच आहे अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते दानवे यांनी केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ubt leader ambadas danve slams dcm devendra fadnavis over crime increasing in maharashtra kjp 91 zws