पुणे : शिवसेनेतील बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या मोटारीवर शिवसैनिकांनी मंगळवारी रात्री कात्रज चौकात हल्ला केला. दगडफेकीत सामंत यांच्या मोटारीची काच फुटली. कात्रज भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका कार्यक्रमासाठी आले होते. कात्रज भागात शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची सभा मंगळवारी रात्री पार पाडली. शिंदे यांच्यासह सामंत आले होते.

सामंत कात्रज चौकातून मोटारीतून जात असताना शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली आणि सामंत यांची मोटार अडवून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी गर्दीत एकाने सामंत यांच्या मोटारीवर दगड फेकल्याने काच फुटली. सामंत यांच्या मोटारीवर हल्ला झाल्याचे समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शिवसैनिकांनी सामंत यांच्या मोटारीला घेरावो घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने सामंत यांच्या मोटारीला वाट करुन दिली. या घटनेमुळे कात्रज चौकात तणावाचे वातावरण होते.

Story img Loader