डोंबिवली पूर्वेतील नांदिवली भागात एका गृहसंकुलात सोसायटीत सत्यनारायणाची पूजा आणि हळदी कुंकु कार्यक्रम करण्यावरून मराठी, अमराठी भाषकांमध्ये नेहमीप्रमाणे वाद झाला.मराठी भाषक आपला धार्मिक कार्यक्रम करण्यावर ठाम होते.तर अमराठी भाषक हा कार्यक्रम होऊ देणार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर हा विषय पोलीस ठाण्यात गेल्यानंतर मानपाडा पोलिसांनी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अमराठी भाषकांविरुध्द एका मराठी भाषक महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणावरून राजकीय वर्तुळामधून प्रतिक्रिया येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्याचदरम्यान राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत हे पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर मराठी भाषा विभागाच्या वतीने ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत ‘विश्व मराठी संमेलन २०२५’ आयोजित करण्यात आले आहे. त्या कार्यक्रमाचा आढावा घेण्यास आले होते.त्यावेळी उदय सामंत यांनी अनेक राजकीय घडामोडी बाबत भाष्य केले.तर मागील अनेक दिवसांपासून मराठी आणि अमराठी व्यक्तीमध्ये बोलण्यावरून वाद होण्याच्या घटना घडल्या आहेत.तर या संमेलनामध्ये त्यावर चर्चा होणार आहे का ? येत्या काळात काही निर्णय घेणार आहात का ? त्या प्रश्नावर उदय सामंत म्हणाले की,आपली मातृभाषा मराठी असून आपल्या मराठी भाषेबाबत जर कोणी अटकाव करीत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे.तसेच अशा प्रकारची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही.आपल्याला प्रत्येक भाषेचा आदर आहे.आपण कधीही त्यांच्या भाषेचा अनादर करीत नाही.पण महाराष्ट्रात येऊन मराठी भाषा बोलु नये किंवा हळदी कुंकूवाची कार्यक्रम घेऊ नये,अशा प्रकारची जर कोणी जबरदस्ती करत असेल तर सध्याच्या कायद्यापेक्षा कडक कायदा झाला पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी मराठी भाषा बोलली गेली पाहिजे,अशी भूमिका त्यावर त्यांनी मांडली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uday samant reaction on argument between marathi and non marathi over satyanarayan puja svk 88 zws