मंत्री उदय सामंत यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. महाविकास आघाडीची वज्रमूठ मजबूत आहे की नाही यावरती त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील नेत्यांची वक्तव्ये आणि अजित पवार यांचे वक्तव्य बघता महाविकास आघाडीची वज्रमूठ मजबूत नसल्याचे ते म्हणाले. दोघांच्या वक्तव्यामध्ये मोठीच तफावत असल्याचं त्यांनी म्हटलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अजित पवार यांना तुमच्या पक्षातूनदेखील निमंत्रण आले, या प्रश्नावर बोलताना सामंत म्हणाले की, “पक्षात कोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही हे एकनाथ शिंदे ठरवतात. कारण ते शिवसेनेचे मुख्य नेते आहेत.” पुढे ते म्हणाले, महाविकास आघाडीत काय घडत आहे हे तुम्हाला सांगतो. उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणत आहेत की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अकार्यक्षम आहेत, ते काम करत नाहीत, त्यांनी मणिपूरला जावं. तर दुसरीकडे अजित पवार हे पत्रकार परिषद घेऊन सांगत आहेत की पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधींनंतर कर्तबगार कोणी असतील तर ते नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळं महाविकास आघाडीतील वज्रमूठ किती मजबूत आहे हे बघण्यास मिळत आहे.

हेही वाचा – पिंपरी: औद्योगिकनगरीच्या विकासासाठी आता ‘शाश्वत विकास कक्ष’!

उदय सामंत यांच्या उपस्थितीत आज पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत इंद्रायणी आणि पवना नदी प्रदूषणमुक्त करण्यासंबंधी बैठक झाली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आयुक्त शेखर सिंह यांच्यासह पालिका अधिकारी उपस्थित होते.