पुणे प्रतिनिधी: संजय राऊत साहेबांना ४१ आमदारांनी केलेल्या मतदानामुळे खासदारकी मिळाली आहे. मी जर त्यांच्या जागी असतो तर मी पहिल्यांदा खासदारकीचा राजीनामा दिला असता आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांना सल्ला दिला असता. अशा शब्दात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांना टोला लगावला.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शेडी जाणव्याचं हिंदुत्व स्वीकारलं नाही. दाढी वगैरे वाढवणं आपल्या धर्मात बसत नाही. त्यामुळे सावरकरांच्या यात्रेत गुळगुळीत दाढी करून एकनाथ शिंदे फिरणार आहेत का? एकनाथ शिंदेंनी सगळ्यात आधी आपली दाढी काढली पाहिजे. असा संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. त्या प्रश्नावर उदय सामंत यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भूमिका मांडली.

Shreyas Iyer to captain Mumbai Team in Syed Mushtaq Ali Trophy Prithvi Shaw included in Squad Ajinkya Rahane
Shreyas Iyer: श्रेयस अय्यरच्या खांद्यावर ‘या’ संघाने कर्णधारपदाची दिली जबाबदारी! अजिंक्य रहाणेही अय्यरच्या नेतृत्त्वाखाली खेळणार
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Ajit Pawar: ‘विलासराव देशमुख आघाडीचे सरकार चालविण्यात पटाईत’, अजित पवारांचे सूचक विधान; महायुतीला इशारा?
savita malpekar marathi actress talks about groupism
“त्याने मराठी इंडस्ट्रीत सर्वात पहिली गटबाजी सुरू केली”, सविता मालपेकरांनी थेट सांगितलं नाव; म्हणाल्या, “मला काय देणंघेणं…”
Bajaj auto cng bike
भविष्यात बजाजची बायोगॅसवर चालणारी दुचाकी! राजीव बजाज यांची मोठी घोषणा
security guards at VN Desai Hospital , VN Desai Hospital,
डॉक्टरांच्या आंदोलनानंतर व्ही. एन. देसाई रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांमध्ये वाढ, मुंबई महानगरपालिका आयुक्तांसोबतच्या चर्चेनंतर निघाला तोडगा
savita malpekar bald look in kaksparsh praises Mahesh Manjrekar
“महेशने विचारलं टक्कल करशील का? मी लगेच…”, सविता मालपेकरांनी सांगितला ‘काकस्पर्श’चा किस्सा, म्हणाल्या…

यावेळी उदय सामंत म्हणाले की, संजय राऊत यांची दखल केवळ आपण (प्रसार माध्यम) घेता. राज्यातील जनता त्यांची दखल घेत नाही. मी त्यांच्यावर आठ पंधरा दिवसामधून एकदाच भूमिका मांडतो. आम्हाला काम भरपूर असून त्यांना सकाळी साडे नऊ वाजता टीव्ही लावल्यावर तारक मेहता का उलटा चष्मा सारखे असतात. त्यामुळे त्यांच्यावर बोलून कशाला त्यांना मोठ करायचं, तसेच सकाळी साडे नऊ वाजता होणारी पत्रकार परिषद ही जातीय तेढ निर्माण करणारी असल्याचं सांगत संजय राऊत यांच्यावर त्यांनी टीका केली.