राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार म्हणाले होती की, कसबा मतदारसंघात भाजपाकडून कोणताही नेता आला तरी रविंद्र धंगेकर यांचा विजय निश्चित आहे. त्यावर उदयनराजे यांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले की, “कोणत्याही परिस्थितीत हेमंत रासने हेच निवडून येणार आहेत. त्याचबरोबर अजित पवार मोठा माणूस आहे. मला तर भविष्य काही सांगता येत नाही. मी वर्तमानात राहतो. तसेच त्यांना भविष्य सांगण्याची सिद्धी प्राप्त झाली असेल तर मला त्यावर काही बोलायाचे नाही,” अशी भूमिका उदयनराजे यांनी मांडली. हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ कसबा विधानसभा मतदारसंघात आले असता उदयनराजे यांनी ही प्रतिक्रिया दिली.
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली असून, भाजपाकडून हेमंत रासने, तर महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर आणि हिंदू महासंघाचे आनंद दवे यांच्यासह अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या पार्श्वभूमीवर आज कसबा विधानसभा मतदारसंघात प्रचारार्थ भाजपाचे खासदार उदयनराजे आणि भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ हे आले होते.
प्रचारावेळी माध्यमांशी संवाद साधताना खासदार उदयनराजे म्हणाले की, कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. त्याबद्दल त्यांना आदरांजली दोतो आणि ताईंची राहिलेली उर्वरित कामे हेमंत रासने हे करणार आहेत. या निवडणुकीत हेमंत रासने याना मतदार राजाकडून मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेता हेमंत रासने यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास उदयनराजे यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार म्हणाले होती की, कसबा मतदारसंघात भाजपाकडून कोणताही नेता आला तरी रविंद्र धंगेकर यांचा विजय निश्चित आहे. त्यावर उदयनराजे यांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले की, सर्व नेते मंडळी हेमंत रासने यांच्या प्रेमापोटी येत आहेत. तसेच निवडणुका आल्या की, प्रत्येक जण आपापली बाजू मांडत असतो. तसेच त्यांना जे बोलायाचे आहे, ते त्यांना बोलू द्या, पण आजपर्यंत काम का झाले नाही. कोणाला निवडून आणायचे हे लोक ठरवतील. पण कोणत्याही परिस्थितीत हेमंत रासने हेच निवडून येणार आहेत. त्याचबरोबर अजित पवार मोठा माणूस आहे. मला तर भविष्य काही सांगता येत नाही. मी वर्तमानात राहतो. तसेच त्यांना भविष्य सांगण्याची सिद्धी प्राप्त झाली असेल तर मला त्यावर काही बोलायाचे नाही, अशी भूमिका उदयनराजे यांनी मांडली.
श्रीकांत शिंदे यांनी हल्ल्याची सुपारी दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. या प्रकरणी गृहमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. त्यावर उदयनराजे म्हणाले की, मग चांगल आहे, असे सांगत स्पष्टपणे या प्रकरणी त्यांनी भूमिका मांडणे टाळले.