खासदार उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे येथे भेट घेतली. यावेळी उदयनराजेंनी अजित पवार यांना प्रस्ताव देत सातारा पालिकेच्या नवीन वाढीव हद्दीतील विकास कामांना प्राथमिक सोयी सुविधांसाठी ५० कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी केली. यावेळी मुख्याधिकारी अभिजित बापट देखील उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सातारा पालिकेच्या हद्दवाढीतील भागात सोयी सुविधा पुरविण्यासाठी राज्य शासनाने ४८ कोटी ५० लाख रुपये इतके अनुदान उपलब्ध करावे, अशी मागणी सातारा विकास आघाडीचे नेते व खासदार उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. उदयनराजे भोसले यांनी पुण्यातील शासकीय विश्रामगृहात
अजित पवार यांची भेट घेतली.

सातारा पालिकेची हद्दवाढ, सोयी सुविधांसाठी विकास निधीची मागणी

उदयनराजे भोसले आणि अजित पवार यांच्यातील वैर सर्वांनाच माहिती आहे. पण, आज सातारा पालिकेच्या विकास कामांच्या निमित्ताने खासदार उदयनराजेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. सातारा ही ‘अ’ वर्ग पालिका आहे. नुकतीच सातारा पालिकेची हद्दवाढ झालेली आहे. त्यामुळे २१.०४ चौ.कि.मी. इतके क्षेत्र वाढ होऊन एकूण २९.१९ चौ.कि.मी. इतके झाले. हद्दवाढ झालेल्या क्षेत्राचे संपूर्ण सर्वेक्षण करण्यात आले आहे. या भागातील आवश्यक ते रस्ते, गटारी, पथदिवे व खुल्या जागा विकसित करणे इ. प्राथमिक सोयी सुविधा पुरविण्यसाठी पहिल्या टप्प्यातील कामांची अंदाजपत्रक पालिकेने केली आहेत. त्याची एकूण किंमत ४८ कोटी ५० लाख रुपये इतकी आहे.

हेही वाचा : उदयनराजे भोसले पुन्हा राष्ट्रवादीत जाणार? अजित पवारांसोबत भेटीनंतर केलेल्या विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण; म्हणाले, “माझ्या मते…”!

हद्दवाढ झालेला हा भाग मूळ हद्दीपेक्षा जवळपास तिप्पट मोठा आहे. त्या भागातील सुमारे ६० हजार ३७३ इतक्या लोकसंख्येस पायाभूत सुविधा पुरविणे आर्थिकदृष्ट्या पालिकेला शक्य नाही. त्यामुळे नव्याने हद्दीत आलेल्या भागामध्ये प्राथमिक सोयी सुविधा पुरविणेसाठी शासनाच्या विभागाकडून निधी प्राप्त होतो. त्या अंतर्गत सातारा पालिकेला ४८ कोटी ५० लाख रुपये इतका निधी मंजुर करावा, अशी मागणी उदयनराजेंनी अजित पवार खासदार यांची भेट घेऊन केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Udayanraje bhosale meeti ajit pawar in pune demand fund for satara development pbs