पिंपरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले यांना अटक करण्यात आली आहे. बॅलेट युनिट उलट्या लावल्याचा जाब विचारल्याने खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप भोसले यांनी केला आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात दोन्ही शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून श्रीरंग बारणे तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून संजोग वाघेरे रिंगणात आहेत. सकाळपासून मावळमध्ये मतदान सुरु आहे.

Uddhav Thackeray, Ahilyanagar, existence,
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती, अस्तित्वाचा प्रश्न
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Amol Mitkari Taunts Raj Thackeray
Raj Thackeray : “राज ठाकरेंनी त्यांच्या सुपुत्राचा पराभव का झाला आणि मनसेचा…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला
ubt loyal former corporator rajul patel join shinde shiv sena
राजूल पटेल यांचा ठाकरेंना जय महाराष्ट्र; विभागातील राजकारणाला कंटाळून निर्णय
uddhav thackeray loksatta news
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊत यांनी मांडली भूमिका
उद्धव ठाकरेंची स्वबळाची भूमिका टोकाची नाही : शरद पवार
ashish shelar uddhav thackeray (2)
“करगोटा निसटायच्या वयात…”, शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले, “अमित शाहांच्या पाठीवर वळ…”
uddhav thackeray sharad pawar
उद्धव ठाकरेंचे स्वबळाचे सूतोवाच, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “फार टोकाची…”

आणखी वाचा-भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या शिवाजीनगरमधील मतदारांमध्ये निरुत्साह? आतापर्यंत अवघे २३.२६ टक्के मतदान

ठाकरे गटाचे शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले हे थेरगाव येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी गेले होते. बॅलेट युनिट उलट्या लावल्याचे दिसल्याने भोसले यांनी मोबाइलमध्ये चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना चित्रीकरण करण्यापासून अडविले. त्यानंतर भोसले यांनी मशीन हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार देत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी भोसले यांनी तत्काळ अटक केली. न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

Story img Loader