महाराष्ट्रामधून वेदान्त – फॉक्सकॉन प्रकल्पानंतर ‘टाटा एअरबस’ प्रकल्प गुजरातला गेला आहे. यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून शिंदे – फडणवीस सरकारवर विरोधी पक्षातील नेत्यांनी आरोप करण्यास सुरुवात केली आहे.या सर्व राजकीय आरोप प्रत्यारोपा दरम्यान पुण्यातील फर्ग्युसन रोड, जंगली महाराज रोडवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेनेच्या युवा सेनेमार्फत ठिकठिकाणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करणारे, ‘उद्धवचा वाटा महाराष्ट्राचा घाटा’ असे फ्लेक्स लावले आहेत.
त्यावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना. महाराष्ट्रामधून किती प्रकल्प कधी आणि कुठे गेले आहेत.त्या नावाची यादी प्रसिद्ध करून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्यात आले आहे.हे फ्लेक्स शहरातील नागरिकाचे लक्ष्य वेधून घेत आहेत.