प्रतापगड उत्सव समितीतर्फे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना यंदाचा हिंदूवी स्वराज्यभूषण वीर जिवा महाले पुरस्कार जाहीर झाला आहे.
शिवप्रतापदिनाचे औचित्य साधून प्रतापगड येथे शुक्रवारी (२८ नोव्हेंबर) सकाळी अकरा वाजता होणाऱ्या होणाऱ्या कार्यक्रमात युद्धशास्त्राच्या इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक शशिकांत मेहेंदळे यांच्या हस्ते उद्धव ठाकरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. नंदू फडके यांना ‘शिवभूषण गोपीनाथपंत बोकील अधिवक्ता’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. करवीर पीठाचे शंकराचार्य, संभाजी भिडेगुरुजी, विश्व हिंदूू परिषदेचे राष्ट्रीयमंत्री व्यंकटेश आबदेव, शिवसेनानेते दिवाकर रावते, विजयाताई भोसले या प्रसंगी उपस्थित राहणार असून राष्ट्रीय कीर्तकार चारुदत्त आफळे अफजलखान वधाचा पोवाडा सादर करणार आहेत, अशी माहिती समितीचे कार्याध्यक्ष मििलद एकबोटे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

Story img Loader