अमित शाह यांनी आज पुण्यातील भाजपाच्या कार्यक्रमात शरद पवार यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले, त्यांच्यावर सडकून टीका केली. ” कसाबला बिर्याणी खायला देणाऱ्या काँग्रेससोबत उद्धव ठाकरे गेले आहेत, याकुब मेननला सोडण्याची मागणी करणाऱ्यांबरोबर ठाकरे बसले आहेत, झाकिर नाईक यांना शांततादूत बवनण्यांच्या मांडीवर उद्धव ठाकरे बसले आहेत, PFI या संघटनेला पाठिंबा देणाऱ्यांचा मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले आहेत, संभाजीनगरला विरोध करणाऱ्यांना पण हे साथ देत आहेत, यांना लाज वाटली पाहिजे ” अशी टीका अमित शाह यांनी यावेळी केली. राज्यात ‘ औरंगजेब फॅन क्लब ‘ म्हणजे कोण तर ते म्हणजे महाविकास आघाडी. आणि या औरंगजेब फॅन क्लबचे नेते आहेत उद्धव ठाकरे अशी बोचरी टीका अमित शाह यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुण्यात गेले दोन दिवस भाजपाच्या राज्य कार्यकारिणीचे आयोजन केले होते. याचा समारोप केंद्रीय गृहमंत्री, भाजपाचे नेते अमित शाह यांच्या भाषणाने झाला. त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी तयारीला लागण्याच्या सूचना केल्या. यावेळी पण भाजपाच्या नेत्वृत्वाखाली महायुती पुन्हा सत्तेत येईल असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray is the leader of aurangzeb fan club amit shah criticised asj