भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज पुण्यातील मानाचा कसबा गणपतीचे दर्शन घेत आरती केली. त्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधी सोबत संवाद साधताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. “ज्यावेळी ठाकरे सरकार गेलं त्यावेळी राज्यावरील अमंगल गेलं आहे. त्यामुळे आता एकनाथ आणि देवेंद्र हे दोघे जण महाराष्ट्राचे मंगलमय जीवन करणार आहे. अहो उद्धव ठाकरे साहेब, आपल्या माफिया सरकारला महाराष्ट्राच्या जनतेने कायमच रवाना केलं आहे. उजवा हात तर जेलमध्ये गेला आहे, तुमचा डावा हात देखील जेलमध्ये जाणार आहे. आता तुम्ही तुमच्या पोराची देखील काळजी घ्या ” असे सोमय्या म्हणाले.

हेही वाचा >>> पुण्याच्या गणपती विसर्जन मिरवणुकीबाबतची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

“आज दुपारी चार ते साडेचार वाजण्याच्या सुमारास मुंबई महापालिकेने आदित्य ठाकरे आणि अस्लम भाई यांच्या आशिर्वादने मढ स्टुडिओचा हजार कोटींच्या घोटाळ्याची चौकशी केली आहे. पर्यावरण विभागाने हजार कोटींचा घोटाळा केलेला आहे. हे सिद्ध होणार आहे. त्यामुळे ठाकरेंनी स्वतः च्या मुलाची काळजी घ्यावी” असे वक्तव्य सोमय्या यांनी यावेळी केले.

हेही वाचा >>> मुंबई महापालिकेसाठीच्या महायुतीत मनसे नको ; रामदास आठवले यांचा सल्ला

“मागील वर्षी गणरायाला निरोप देताना मी जेलमध्ये जात होतो आणि आज संबध महाराष्ट्र जेलमधून बाहेर आलेला आहे. त्या करता मी आज पुण्यात मानाचा पहिला कसबा गणपतीच्या दर्शनाला आलो आहे. गणराया हा विघ्नहर्ता, विद्येची, शक्तीची देवता आहे. तसेच मागील अडीच तीन वर्षात महाराष्ट्र राज्य मागे गेलं आहे. या राज्याला विकासाच्या पथावर घेऊन जाण्याची शक्ति दे, हीच माझी गणरायाकडे प्रार्थना आहे” असेही त्यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्राचे कलंक ट्विन रिसॉर्ट पाडण्याच्या कामाला गती देण्यासाठी दापोली येथे जाणार आहे अशीही प्रतिक्रिया सोमय्या यांनी दिली आहे.

Story img Loader