पुणे : शैक्षणिक वर्ष २०२३-२४मध्ये पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) केंद्रीय विद्यापीठ प्रवेश परीक्षा (सीयूईटी) घेतली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना बारावीनंतर वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा द्याव्या लागू नयेत यासाठी राज्य विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, खासगी विद्यापीठे आणि अन्य उच्च शिक्षण संस्थांनी केंद्रीय विद्यापीठ प्रवेश परीक्षा (सीयूईटी) स्वीकारावी. तसेच सीयूईटीतील गुण प्रवेशासाठी वापरावे, असे आवाहन विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) केले. यूजीसीचे सचिव प्रा. मनीष जोशी यांनी या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> पुण्यात शिंदे-ठाकरे गटात राडा; दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी

यूजीसीने गेल्यावर्षी पहिल्यांदा राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणामार्फत (एनटीए) विद्यापीठ प्रवेशांसाठी सीयूईटी ही प्रवेश परीक्षा घेतली. देशभरातील केंद्रीय विद्यापीठांसह काही राज्य विद्यापीठे, अभिमत विद्यापीठांनी ही प्रवेश परीक्षा स्वीकारली. आता शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी होणाऱ्या सीयूईटीच्या पार्श्वभूमीवर यूजीसीकडून विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांना आवाहन करण्यात आले आहे.  सीयूईटीसाठी विद्यार्थ्यांना दोन भाषा, सर्वसाधारण चाचणीसह सहा विषय निवडण्याची मुभा आहे. इंग्रजी, हिंदीसह एकूण तेरा भाषांमध्ये परीक्षा घेतली जाईल. विद्यार्थी संख्या आणि त्यांचे विषय या नुसार दिवसभरातील तीन सत्रांत वेगवेगळ्या दिवशी ही परीक्षा घेतली जाईल. अधिक माहितीसाठी राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाशी संपर्क साधावा, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.