पुणे : देशभरातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये होणारी प्राध्यापकांची नियुक्ती आणि पीएच.डी. पदवी देण्याच्या प्रक्रियेवर आता विद्यापीठ अनुदान आयोगाकडून लक्ष ठेवले जाणार आहे. या प्रक्रियेत होणारे उल्लंघन रोखण्यासाठी यूजीसीने एक स्थायी समिती स्थापन केली असून, प्राध्यापकांच्या नियुक्ती आणि पीएच.डी. संदर्भातील नियमांच्या उल्लंघन प्रकरणांमध्ये ही समिती लक्ष घालून कारवाई प्रस्तावित करणार आहे.

यूजीसीने या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. प्राध्यापक नियुक्तीसाठी यूजीसीने २०१८ मध्ये आणि पीएच.डी.साठी २०२२ मध्ये नियमावली प्रसिद्ध केली आहे. ही नियमावली उच्च शिक्षण संस्थांना बंधनकारक असल्याने नियमावलीनुसारच प्रक्रिया राबवणे अपेक्षित आहे. मात्र या प्रक्रियेत उच्च शिक्षण संस्थांकडून अनियमितता होत असल्याचे, नियमांचे उल्लंघन होत असल्याचे यूजीसीच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे नियमावलीचे होणारे उल्लंघन रोखण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचे यूजीसीने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले.

article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र :  राज्य सेवा मुख्य परीक्षा – मानवी हक्क विकासात्मक मुद्दे
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
upsc exam preparation guidance in marathi
UPSC ची तयारी : नैतिक विचारसरणीच्या विविध चौकटी (भाग-१)
mpsc exam preparation
MPSC मंत्र : राज्य सेवा मुख्य परीक्षा- मानवी हक्क पारंपरिक अभ्यास
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : नीतिशास्त्र, सचोटी  आणि नैसर्गिक क्षमता
RBI announces changes to KYC rules! How it will impact you
KYC : RBI ने केली KYC नियम बदलण्याची घोषणा, आपल्यावर नेमका कसा परिणाम होणार?
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?
MPSC Mantra State Services Main Exam Science and Technology
MPSC मंत्र: राज्यसेवा मुख्य परीक्षा; विज्ञान व तंत्रज्ञान

स्थायी समिती ठरावीक काळानंतर भेटून तक्रारींचा आढावा घेईल, त्या संदर्भातील कागदपत्रांची छाननी करेल आणि त्यानंतर नियमावलीच्या उल्लंघनाबाबत यूजीसीकडे कारवाई प्रस्तावित करेल असे नमूद करण्यात आले आहे. उच्च शिक्षण संस्थांकडून नियमावलीचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास भागधारकांनी quality- phd@ugc. gov. in या ईमेलवर तक्रार नोंदवण्याबाबत नमूद करण्यात आले आहे.