पुणे : सहायक प्राध्यापक पदासाठी आणि पीएच.डी. प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या विद्यापीठ अनुदान आयोग राष्ट्रीय पात्रता परीक्षेचे (यूजीसी नेट) वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले. त्यानुसार ही परीक्षा येत्या १८ जूनला देशभरात घेतली जाणार आहे. आतापर्यंत पीएचडी प्रवेशासाठीची परीक्षा विद्यापीठ स्तरावर घेतली जात होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> हिंजवडी-शिवाजीनगर मार्गासाठी पहिली मेट्रो पुण्यात दाखल

मात्र युजीसीने पीएचडी प्रवेशासाठी नेट परीक्षा ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे यंदा प्रथमच नेट परीक्षेच्या गुणांच्या आधारे देशभरातील विद्यापीठांमधील पीएच.डी. पदवीसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. त्यानुसार राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाकडून (एनटीए) नेट परीक्षा सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेबारा, दुपारी तीन ते सायंकाळी सहा अशा दोन सत्रात घेतली जाणार आहे. यंदाची नेट परीक्षा लेखी पद्धतीने घेतली जाणार आहे. एनटीएने परीक्षेच्या तारखेसह परीक्षा शहर पत्रक प्रसिद्ध करण्याबाबतची माहिती जाहीर केली. त्यानुसार अर्जदारांसाठी परीक्षा शहर पत्रक परीक्षेच्या दहा दिवस आधी म्हणजेच ८ जूनला उपलब्ध करून दिले जाणार आहे. या पत्रकाद्वारे उमेदवार त्यांच्या परीक्षेच्या शहराबाबत माहिती घेऊन प्रवासाचे नियोजन करू शकतात. अधिक माहिती युजीटी नेटच्या संकेतस्थळावर देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले.