अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी केल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभाग घेतला. तसेच निवडणूक आयोगाकडे जात थेट राष्ट्रवादी पक्षाचं अध्यक्षपद, पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह असं सगळ्यावरच दावा केला. यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी पक्षावर हक्क कुणाचा हा वाद आयोगाकडे गेल्याने पुढे काय होणार याविषयी चर्चा सुरू आहेत. त्यावर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी प्रतिक्रिया देत कायदेशीर बाजू सांगितली आहे. ते गुरुवारी (६ जुलै) टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

उल्हास बापट म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करणाऱ्या अजित पवार गटाचा दावा आहे की, त्यांच्याकडे विधीमंडळात बहुमत आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की, खरा पक्ष वेगळा आणि विधीमंडळ पक्ष वेगळा. त्यामुळे खरा पक्ष शरद पवारांकडे आहे आणि विधीमंडळ पक्ष अर्थात अजित पवारांकडे आहे.”

Image of L&T Chairman And Logo
“काहीतरी उल्लेखणीय करण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज”, अध्यक्षांच्या वादग्रस्त विधानावर L&T चे स्पष्टीकरण
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
NCP Sharad Pawar Group Politics
NCP : ‘प्रदेशाध्यक्षांसह सर्वांचे राजीनामे घ्या’, शरद पवारांसमोरच कार्यकर्त्याची जयंत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी, नेमकं काय घडलं?
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : अजित पवारांच्या पक्षाकडून ऑफर आली का? विचारताच बजरंग सोनावणे म्हणाले, “आम्ही आठही खासदार….”
Rohit Pawar On Ajit Pawar group
Rohit Pawar : अजित पवार गटाकडून शरद पवारांच्या खासदारांना ‘ऑफर’? रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “अधिवेशन होतं तेव्हा…”
Tejswini Pandit
“लवकर बरं व्हायचं आहे”, तेजस्विनी पंडितला नेमकं झालंय तरी काय? पोस्टवर स्वप्नील जोशी, सिद्धार्थ जाधवने केल्या कमेंट्स
Ajit Pawar
Ajit Pawar : “तुम्ही मला मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात…”, अजित पवार भर सभेत संतापले, नेमकं काय घडलं?
ajit pawar group on suresh dhas
Suraj Chavan: “..तेव्हा गृहखातं झोपा काढत होतं काय?”, सुरेश धसांच्या विधानानंतर अजित पवार गटाच्या नेत्याची टीका

“अजित पवारांनी दावा करण्याला काहीही अर्थ नाही”

“आता कुठला पक्ष खरा हा निर्णय निवडणूक आयोगाला घ्यावा लागेल. अजित पवारांनी आपणच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा दावा करण्याला काहीही अर्थ नाही. आज शरद पवारांच्या पक्षाची घटना निवडणूक आयोगाकडे आहे. खरा पक्ष अजून शरद पवारांकडेच आहे. जे निवडून आलेले लोक असतात ते पक्षाच्या बळावर निवडून येतात. त्यामुळे विधीमंडळ पक्ष खरा पक्ष होऊ शकत नाही,” असं मत उल्हास बापट यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : एकनाथ शिंदेंच्या चुकांमधून धडा घेत राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबाबत अजित पवारांची मोठी खेळी, बंडाच्या दोन दिवसआधीच…

“आमदाराने पक्ष सोडणं म्हणजे आईला सोडण्यासारखं”

उल्हास बापट पुढे म्हणाले, “लोक त्या आमदाराला मत करत नसतात त्या पक्षाला मत करतात. मतदार त्या पक्षाच्या विचारधारेला मत करत असतात. त्यामुळे आमदार पक्ष सोडून दुसरीकडे गेला, तर स्वतःची आई सोडून तिकडे गेल्यासारखं आहे. तुम्ही नाळ तोडू शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळे बाहेर गेले तो विचार करण्याचा एक मुद्दा आहे. परंतु तिथं बहुमत आहे म्हणून तो पक्ष त्यांचा असा दावा अजित पवारांना करता येऊ शकत नाही.”

हेही वाचा : मनसेकडून ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव? राज ठाकरेंचे विश्वासू अभिजीत पानसे म्हणाले…

“अजित पवारांना पक्षावर किंवा पक्षचिन्हावर दावा करता येणार नाही”

“आत्ता अजित पवारांना पक्षावर किंवा पक्षचिन्हावर दावा करता येणार नाही. त्यांना आत्ता निवडणूक आयोगाकडे जावं लागेल. तिथं आयोग कुठला पक्ष खरा यावर निर्णय घेईन. त्यानंतर मग पक्ष आणि पक्षचिन्ह कुणाकडे हे ठरेल,” असंही उल्हास बापट यांनी नमूद केलं.

Story img Loader